Sunday, November 16, 2014

Study Leave Scenes. An Engineer's guide to PL.

 दिवाळी संपली की दिवे लावायची तयारी सुरु होते ती म्हणजे engineering student च्या घरात. भावंडांची terminal exam, आईनी केलेली दिवाळीची स्वच्छता, केलेला फराळ (इथे केलेला म्हणजे आईनी बनवलेला आणि आपण संपवलेला या अर्थाने ), वीस दिवसाआधी केलेलं submission, october चं कडक ऊन यामुळे इतकी दमणूक झालेली असते ना. ही दिवाळीची सुट्टी अगदी गरजेची असते. या सुट्टीला आई वडील 'study leave' असं म्हणतात. आता 'leaving study' आपण पूर्ण मन लावून आणि निष्ठेने करत असतो, मग कुठे चुकत आहे हे समजेनासे होते. ५ semester झाले तरी याबाबतचा गैरसमज पालकांचा काही जात नाही. पण काय करणार, आपल्याला engineering ला घातलं यातला त्यांचा optimism लक्षात घ्या .
>                अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे Timetable बनवणे. Timetable बनवायचा फायदा म्हणजे त्यात सहज एक-दोन दिवस निघून जातात. आपण काहीतरी Productive करत आहोत ही भावना येते. ही भावना अजून कोणत्याही PL च्या दिवशी येणार नाही! आता हे Timetable आपण कधीही पालणार नाही म्हणून त्याचं planning करायचं नाही का?
> अजिबात नाही! कष्ट करून एक चोख TT करायचं. अमुक दिवस - अमुक विषय. हे करण्या एवढं गणित आपण अजून विसरलो नसतो. प्रत्येक online गोष्टी सारखी online exam ही वाया घालवली असते आणि insem theory असेल तर 'तीस मार्क हां', म्हणून स्वत:ला 'तीस मार खान' समजत असतो. शेवटी बेरीज करून, "हां, आता मला या परीक्षेत एवढे मार्क आणायचे आहेत" असं म्हणून एक magic figure आपण आणतो. Magic या अर्थी, की ती total च्या बरीच जवळ असते. पण मग - 'अरे त्या Ma'am छान आहेत', 'तारखेची  बेरीज ७ होती', 'अच्छे दिन आने वाले है' - म्हणून आपण  आकडा कमी  करतो. मग TT पाहिलं की समजतं की अरे, दिवसाला २ unit? फक्तं? मग जरा परवाच सुरु करते. अजून १० दिवसांनी झोप होणार नाही ना नीट, मग आत्ताच काढून घेऊया! झोपेचं असं महिन्याचं accounting होतं, हे लोकांना अजून कसं आणि का पटत नाही, देव जाणे.
>                 वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या 'Secondhand reference book' ना दुसरा हातही लागलेला नसतो, पण PL मध्ये त्यांचा नक्की वापर होतो बरंका! काढलेल्या notes उडून न जाण्यासाठी त्यावर ठेवा, चुरगाळलेल्या pages ना सरळ करण्यासाठी त्यात ठेवा, परिक्षेच्या दिवसात exercise तर पाहिजे - तर ही reference books उचला. पाठ सांभाळून हां !
>                 अजूनही Textbook घेतलं नसेल, तर घाबरू नका - अगदी दुकानदाराच्या डोळयात बघून मागा. Reference Book मधून अभ्यास करीन असं म्हणणाऱ्या दीडशहाण्या मुलांसाठी दिवाळी चा special stock आणलेला असतो.
>            पुढची पायरी म्हणजे आपली strategy. ती या ३ phases मधून जाते या एका दिवसात .
> १. Reference Book  नको  आपण Textbook च वापरू
> २. या आधी  विचारलेले प्रश्नच बघू .
> ३. ३ वर्षाहून अधिक विचारलेले प्रश्नच बघू .> काही Most  Recently asked, Least recently asked, most asked in May असे algorithms वापरतात.  प्रत्येकाचा आपला विश्वास. हा दिवस म्हणजे अादला दिवस .
>                  दिवसभर आपण सतत Mobile ला चिकटून असतो याची जाणीव होते आणि जरा  वेळ बंद  करूया असं खूप ठरवतो. या अर्ध्या तासात एक Break Up, एक Patch Up, एक WallPost, Crush चा message नक्की येईल .
>                  दुपारी परीक्षा असली की '११th hour' पर्यंत अभ्यास करणे हे आपण सार्थ करत असतो. अगदीच या वेळेस अभ्यास झाला नाही तरी काय काळजी करताय? पुढच्या sem ला नक्की अभ्यास करू !!

3 comments:

  1. Neha, you have a great flair in writing. You have made a good use of the eco-system, when you say “Aache Din Aane Wale Hein”.
    You have precisely captured the mind-set of a budding engineer who goes through the tedious task- of preparation for the exam right from setting the time table to the D Day. You have finely put in the challenges and the distractions the examinee has to undergo.
    All in all, a very good blog. Keep on with your writing spirit and enlighten us.

    ReplyDelete
  2. Thankyou for your words of appreciation :) I'm glad that you could get a sneak peak into our "struggle" as a budding engineer :P Thankyou for sharing my enthusiasm.
    Many More articles to come in the new year :)

    ReplyDelete