सावली - पावलात टाकुनी पाऊल मी वाट दाखवणारी,
तर कधी पाठ राखणारी वाली.
आरसा - पण कजाग काळोखाशी मिळून,
फितूर होतेस तू सावली.
आरसा - उत्तरे शोधत येती माणसे,
माझ्या सत्यवचनाची त्यांना जिज्ञासा.
सावली - जे मनी असे तेच बघे मनुष्य,
बहुरूपी आहेस तू आरसा.
सावली - इकडची गोष्ट तिकडे तुझी,
दिशाहीन सर्वांना करतो.
आरसा - माणूस सोडून आपले अंतःकरण,
तुझ्यात आपल्या सीमाच बघतो.
आरसा - कधी होऊन छोटी लेखतेस तुच्छ,
कधी मोठेपणाने तुझे वर चढवणे.
सावली - न्यायाधीश तूच असशील मोठा,काम माझे राखाडीतच बघणे .
देव - माणसाच्या तुम्ही दोन प्रतिमा,
जणू तुम्हीच त्याचे आपले,
स्वतःच्या शोधातले तुम्ही वाटसरू,
तुम्ही त्यांनाच मापले.
कोनासारखीतरी हवी त्यांना,
बदल घडवण्यास निघाले,प्रत्येकाची प्रतिमा वेगळी,
हे का नाही तुम्हाला कळाले ?
No comments:
Post a Comment