हाती घेऊनी हात म्हणलास "तुझ्या माझ्यातले अंतर तितकेच ,
नकाशावर आपल्याला जोडणाऱ्या रेषेइतकेच.हातांच्या जुळलेल्या रेषा, आज सीमा का आपल्यात ?
जग आपल्या भातुकलीच्या खेळावर करेल का रे मात ?
तू निघालास, ओला तो रुमाल हाती धरला ,
रुमाल कसला, हृदयाने पांढरा झेंडा फडकवला .
रात्री परी येई रात्र जात आहेस इतका लांब ,
स्वप्न तुझे - म्हणून रोखतात तत्व - बोलण्यावाचून थांब.
आठवणींच्या "bag"आंनी तुझी पावले जड झाली ,
मग ओझे मनाचे घेऊन चढायला कशी परवानगी मिळाली ?
आज विमानाने का ओलांडायच्या सीमा, हृदयाला वाटते क्षणभर,
कापरे ते मन विनवते आज त्यासाठी धीर धर .
स्पीकरवरच्या हाकेस ऐकून निघालास ,मनातली प्रार्थना रुसली,
तुझी प्रतिमा होत छोटी आठवणीतच गेली .
दूर जाऊनी, बनून ठिपका विमान गगनाला मिळाले ,
काजळाची रेघ ओलांडून अश्रू आता गळाले.
जणू आयुष्याला करून पाठ ,पाय घराकडे निघाले ,
त्याला म्हणू कसे घर, ते घर न आता राहिले .
मनाचा हा खेळ कसला, वाटला ओळखीचा स्पर्श,
बघून तुला प्रत्यक्ष गगनाला भिडला कोंडलेला हर्ष .
मी विचारले "स्वप्न तुझे, ध्येय तुझे का सोडुनिया आला ?"
तो हसून म्हणतो "विमानाने मला हाच प्रश्न विचारला ".
Beautiful ending!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete