Tuesday, October 28, 2014

A letter from an experienced External Examiner to budding External Examiners sharing the tricks of the trade.

 (This is a sarcastic take on a budding  Engineer's experiences with engineering vivas and external examiners.This should be taken with a pinch of salt.The author doesn't mean to stereotype external examiners but put forth her own personal experiences.I'm sure a lot of fellow engineering students can relate to this )

दिलेली वेळ ही मुलांसाठी, आपल्यासाठी नव्हे. वेळेचं काय म्हणताय, अगदी आरामात जा! अहो, VIVA  मध्ये वाट ही त्यांनी बघायची आणि आपण लावायची. एवढ्या मुलांची "घ्यायची" म्हणजे छान नाश्ता करून यायला नको? उशीर करण्यामागे खरं तर आपला किती नेक विचार आहे. "कधी एकदा माझी  VIVA  होते", ही भावना आपण जागृत करत असतो मुलांमध्ये.
                 लहान मुलं ती, त्यांचं काय ऐकताय? मन लावून ऐकायची वाईट सवय घालवून टाका ! EXTERNAL नी मुलांचं ऐकलेलं बरं दिसतं का? तुम्ही प्रश्नांचा भडीमार चालू ठेवा. प्रश्न कुठले विचारायचे हे शोधायची खूप सोपी युक्ती आहे. बायको भांडणात जे प्रश्न करते ना, ते नीट लक्षात ठेवा आणि इथे विचारा. उदा. - "याची काही गरज होती का?", "कोणी सांगितलं असं करायला?", "काहीच कसे येत नाही ?", "तुम्ही करता तरी काय वर्षभर ?", इत्यादि. कोणाला कुठला प्रश्न विचारायचा या साठी एक scientific and logical technique आहे आणि ती म्हणजे Eeenie Meenie Maini Mo technique. याचा अवश्य वापर करा.                 
                शेवटी माणूस आपण, एवढं काम केलं की  भूक तर लागणारच. पोटातल्या कावळ्या समोर कुठे ऐकू येणारेत मुलांची उत्तरे? चिडचिड तर सहाजिक आहे. तसंच, दिवस मावळला की  घरच्या external चा फोन यायला लागतो. भराभरा आवरून टाका. अजिबात वाईट वाटून घेऊ नका याचं. अहो, एवढंच होतं तर पालकांनी "अक्षय अमराळे", "अदिती अत्रे " असं काहीतरी नाव ठेवलं असतं. आजकाल हे पालक पण ना, तुम्हाला सांगतो, अजिबात मुलांच्या भविष्याचा विचार करत नाहीत.              
                एखाद्या विषयाच्या प्रश्नाचं उत्तर मुलाला आलं नाही की  "सापडला रे सापडला " म्हणून तो विषय धरा. तो विषय एकदा धरला कि त्यावर खोल खोल जाऊन विचारा. उदा. "मला C++ अजिबात येत नाही" असं म्हणणाऱ्याला static polymorphism, dynamic binding नक्की विचारा. उत्तर तुम्हाला माहिती पाहिजेच असं नाही.              
                  External बनायचं असेल तर एक गोष्ट नीट यायला पाहिजे आणि ती म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव लपवणे. ही तर एक कला असून त्याचे आकलन Reality shows मधल्या Judges चे चेहेरे पारखून करण्यात येऊ शकते. External चे तीन चेहेरे हुबेहूब करण्यासाठी एक युक्ती आहे. मुलांकडे बघून मनात हे तीन विचार करा -१.आपल्या देशाचं काही खरं राहिलं नाहीये.२.आपल्या आयुष्याचा खरं अर्थ तरी काय?३.आज गवाराची भाजी आहे जेवायला.हे तीन विचार आलटून पालटून करा.            
                   Internal बरोबर काही "Looks" ठरवून ठेवा. एकमेकांकडे बघून माना हलवणे. म्हणजे "वेळ झाली आहे ना लंच ब्रेक ची ?", कपाळावर हात मारून बघणे म्हणजे "कधी एकदा लंच ब्रेक होतोय", जोरात File बंद करणे म्हणजे "आता तरी घेऊया का ब्रेक ?" इत्यादि.                 
                   काय आहे, आपली कदर आपल्याकडे तर कोणाला नसते. आपल्याकडे आपल्याला कोणी विचारत नाही तर आपण तिकडे  जाऊन विचारायचं. आपला वेळ देऊन आपण किती उपकार करतोय मुलांवर, लक्षात घ्या! किती Thankless job आहे आपला! आपला पाठींबा तर लागतोच मुलांना. इंग्रजी मध्ये म्हणतात ना "We got your " backs " " अगदी तसंच. 
                   फिरून या, खातिरदारी करून घ्या ..काय आहे घरात परत आपण विद्यार्थी आणि बायको external  असते!

Sunday, October 12, 2014

निरोप

हाती घेऊनी हात म्हणलास "तुझ्या माझ्यातले अंतर तितकेच ,
नकाशावर आपल्याला जोडणाऱ्या रेषेइतकेच.
हातांच्या जुळलेल्या रेषा, आज सीमा का आपल्यात ?
जग आपल्या भातुकलीच्या खेळावर करेल का रे मात ?

तू निघालास, ओला तो रुमाल हाती धरला ,
रुमाल कसला, हृदयाने पांढरा झेंडा फडकवला .
रात्री परी येई रात्र जात आहेस इतका लांब ,
स्वप्न तुझे - म्हणून रोखतात तत्व - बोलण्यावाचून थांब.

आठवणींच्या  "bag"आंनी तुझी पावले जड झाली ,
मग ओझे मनाचे घेऊन चढायला कशी परवानगी मिळाली ?
आज विमानाने का ओलांडायच्या सीमा, हृदयाला वाटते क्षणभर,
कापरे ते मन विनवते आज त्यासाठी धीर  धर .

स्पीकरवरच्या हाकेस ऐकून निघालास ,मनातली प्रार्थना रुसली,
तुझी प्रतिमा होत छोटी आठवणीतच गेली .
दूर जाऊनी, बनून ठिपका विमान गगनाला मिळाले ,
काजळाची रेघ ओलांडून अश्रू आता गळाले.

जणू आयुष्याला करून पाठ ,पाय घराकडे निघाले ,
त्याला म्हणू कसे घर, ते घर न आता राहिले .
मनाचा हा खेळ कसला, वाटला ओळखीचा स्पर्श,
बघून तुला प्रत्यक्ष गगनाला भिडला कोंडलेला हर्ष .

मी विचारले "स्वप्न तुझे, ध्येय तुझे का सोडुनिया आला ?"
तो हसून म्हणतो "विमानाने मला हाच प्रश्न विचारला ".