A guy's advice to all the committed guys out there..:P
It was so much fun writing from a guy's perspective.. Gals take a minute and laugh at yourselves :)
मोजून मापून शब्द वापरा अगदी बोलला नाहीत तरी चालेल ,
काय आहे ,त्या शब्दांच बाण करून तुमच्यावरच वापरेल .
ती "SHERLOCK",कर फोन LOCK,नाहीतर मरायचा!
तुझ्या "Chat history" नी "चाट" होऊन तू तिचीच history व्हायचा .
आधीच त्यांना कळवा जर chat करायला जमत नसेल ,
नाहीतर पत्रिका जुळवतात तसा तुमचा "last seen" मैत्रीनिन्चाशी जुळवून चांगली कथा बांधली असेल .
"हे कानातला मी कधी घातला होत सांग?" नवीनच तर आहे अस वाटते अनेक वेळा ,
"ज्या दिवशी तू खूप सुंदर दिसत होती तेव्हा "असं काहीतरी म्हणून "safe" खेळा.
मैत्रिणीचा "bf" काय काय करतो तीचासाठी हे सांगेल ,एखादा त्यात फसावा,
तुम्चाकाधून काय अपेक्षा आहेत हे सांगण्याचा तो मार्ग ,बहुदा मुलगा अस्तित्वात ही नसावा !
प्रश्न विचारायचा त्यांचा हक्क ,उत्तर देणं आपले कर्तव्य !
मोठ्या धैर्याने सामोरे जा ,टाळले तर प्रकरण होते भव्य !
एका वाक्यात उत्तर न्हवे त्यांना संदर्भसाहित स्पष्टीकरण हवे !
आपण एखादा प्रश्न विचारला तर आपण सौन्षयी ,आपला त्यांचावर मुळीच विश्वास न्हवे !
आणि "X-factor" असेल तर जरा जपूनच तुम्ही रहावा ,
घाबरून असते तुमचा "soft corner" वर "तिचा " header नी चुकून goal न व्हावा !
अशी कोणतीच गोष्ट नाही ज्यावर आईचं आणि तिचं पट्ट,
उगाच तिला खुश करायला जाताना विसरू नका तुमचं पोट कोण भरत !
Romantic movies मधे हसू नका ,तिचा पुस्तकांविषयी तुमची मत तुम्चाकडेच ठेवा ,
समजून घ्या तुमच्या भांडणाबद्दल तिच्या मैत्रिणींना कळलंय ते तुम्हाला "look" देऊन जातात जेव्हा
चुकून तुम्ही काही बोललात तर पूर्ण महिला मंडळ भांडायला अंगावर येई ,
आणि तुम्ही एका मित्राला सांगितला कि "breach of conduct" म्हटलं जाई !
कोणाचीही चूक असली ,कोणीही सुरु केली असतील भांडणे ,
सगळा ego बाजूला ठेवा ,काम आपलच आहे sorry म्हणणे !
कितीही अशक्य कधी वाटले तरी मुलं सहन करत राही ,
कारण तिचा बरोबर राहणे तिचा शिवाय राहण्यापेक्षा कधीच अवघड नाही !