आज मी नक्की करणारच असा रोज ठरवत राहते ,
झोप मात्र काळ्या मांजरी सारखी माझ्या वाटेत आडवी जाते !
रोज सकाळी snooze करायचा मग alarm लावायचीच का भानगड ?
उठून स्वताची समजूत काढायची "तसा तो chapter नाहीये फारसा अवघड "!
P.L आहे ही म्हणे ,दिवाळी ची सुट्टी कधी संपली ?
लगेच काय परीक्षा ,मुले submissions नी दमली !
मित्रांना सकाळ -संध्याकाळ "किती झाले ?"विचारत बसणे ,
मग दशा तीच आहे समजून "हुश्श "म्हणून हसणे !
काय किती अवघड आहे यावर सगळ्यांशी चर्चा करतो ,
मग तेवढ्याच वेळात ते करूनही झाले असते हे कळण्यास का बरे हरतो ?
परीक्षेच्या काळात अचानक T.v मालिकांमध्ये चांगले चांगले घडायला लागते ,
दर १० मिनिटांनी बाहेर जाऊन पाणी पिल्याशिवाय थोडी न तहान भागते !
T.V बघून बघून त्याचेच तत्व आचरणात आले ,
काम थोडेच झाले आणि breaks झाले मोठाले !
आज झाला नाही आई पण उद्या नक्की करणारे ,
माहित नाही कधीपर्यंत तो "उद्या " येण्याची ते वाट पाहत राहणारे !
परीक्षेनंतरच्या सुट्टीचे जोरदार "planning" करत बसतो ,
एवढे planning परीक्षेचे केले असते तर पहीलेच अलो असतो !
नाही ,आता केलेच पाहिजे म्हणून जरा मनावर घ्यायचे ,
आणि कधीच आचरणात न आणू असे timetable करून लावायचे !
१००० परीक्षा आयुष्यात दिल्या आता ही ही एक देऊ ,
आई -बाबांनी जेवढे tension घेतले त्यातले थोडे आपणही घेऊ !
पण जो पर्यंत coffee घेऊन आदल्या दिवशी जागत नाही ,
तो पर्यंत वाटतच नाही आपण अभ्यास केलाय काही !